धर्म, धर्मनिरपेक्षता, आणि त्यांमधून उद्भवणारे काही प्रश्न - लेख सूची

धर्म, धर्मनिरपेक्षता, आणि त्यांमधून उद्भवणारे काही प्रश्न – १

आणखी काही दिवसांनी आम्हाला मध्यावधी निवडणुकांना सामोरे जावयाचे आहे. मागच्या निवडणुकीमध्ये विविध पक्षांचे जे बलाबल होते त्याचा अपरिहार्य परिणाम म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय अस्थैर्य हा आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये फार मोठा अडथळा आहे हे कोणालाही मान्य होईल. ह्या वेळच्या ह्या राजकीय अस्थैर्याचे मूळ अलीकडे वाढलेल्या धर्माभिमानामध्ये आणि धर्माच्या आधारावर स्वतःला अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक …

धर्म, धर्मनिरपेक्षता, आणि त्यातून उद्भवणारे काही प्रश्न – २

मागच्या लेखात धर्म आणि धर्मनिरपेक्षता ह्यांविषयी हिन्दुनेतृत्व काय म्हणते आणि त्यांनी केलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येमुळे हिन्दुनेतृत्वाच्या उक्तीमध्ये आणि कृतीमध्ये कशी विसंगती निर्माण होते ते आपण पाहिले. हा लेखामध्ये त्यांच्या व्याख्येमध्ये मला बुचकळ्यात पाडणारे आणखी अनेक शब्द आहेत त्यांचा विचार करावयाचा आहे, तसेच पूर्वीच्या लेखात ज्यांचा परामर्श घेता आला नाही असे मुद्दे विचारार्थ घ्यावयाचे आहेत, व थोडे …

धर्म, धर्मनिरपेक्षता आणि त्यामधून उद्भवणारे काही प्रश्न – ३

प्रस्तुत लेखाच्या प्रारंभी हिन्दू कोण नाही असा प्रश्न मी उपस्थित केला आहे. कारण हिन्दू कोण नाही हे नक्की ठरल्याशिवाय अल्पसंख्याक कोण व बहुसंख्याक कोण याचा, त्याचप्रमाणे कोण कोणाचा अपमान करीत आहे ह्याही प्रश्नांचा उलगडा होत नाही. माझ्या मते कोणीच बहुसंख्याक नाहीत व त्यांचा अपमानही होत नाही. ‘ तुमचा. तुम्ही बहुसंख्याक असून अपमान होत आहे’ अशी …